• Our Blogs
  • बंद पडलेल्या कंपनीकडून पेन्शनधारकांना मिळाली हक्काची पेन्शन
आज हि १२ ते १५ तास काम करून हि हवा तास पगार कामगारांना दिला जात नाही. त्यात सेक्युरिटी गार्डची नोकरी म्हणजे रात्रपाळी ची डूटीही आली कधी कधी १५ तास हि काम करावे लागते, मिळणार पगार हा केवळ १२००० ते १५००० रुपये असतो , त्यात पेन्शनचे पैसे हि कापले जात आणि अचानक कंपनी बंद होते, तेव्हा कळते गेल्या २२ महिन्यापासून कंपनीने आपला पेन्शन जमा केला नाही आहे आणि आता कंपनी बंद झाली तर पेन्शन कुठून द्याचा अशा ठकबाकी कंपनीकडून हक्काची पेन्शन कशी मिळाली हा सांगणार हा लेख आहे.
बंद पडलेल्या कंपनीकडून पेन्शनधारकांना मिळाली हक्काची पेन्शन

बंद पडलेल्या कंपनीकडून पेन्शनधारकांना मिळाली हक्काची पेन्शन

आज हि १२ ते १५ तास काम करून हि हवा तास पगार कामगारांना दिला जात नाही. त्यात सेक्युरिटी गार्डची नोकरी म्हणजे रात्रपाळी ची डूटीही आली कधी कधी १५ तास हि काम करावे लागते, मिळणार पगार हा केवळ १२००० ते १५००० रुपये असतो , त्यात पेन्शनचे पैसे हि कापले जात आणि अचानक कंपनी बंद होते, तेव्हा कळते गेल्या २२ महिन्यापासून कंपनीने आपला पेन्शन जमा केला नाही आहे आणि आता कंपनी बंद झाली तर पेन्शन कुठून द्याचा अशा ठकबाकी कंपनीकडून हक्काची पेन्शन कशी मिळाली हा सांगणार हा लेख आहे.

श्रवण कुमार सिंग, बिंकेटेश शर्मा आणि धनंजय ठाकूर हे “कॅन्डीड गार्ड सर्विसेस,प्रा लिमिटेड” छत्तीसगड रायपूर या कंपनीकडून सेक्युरिटी गार्ड म्हणून " पंजाब सिंध बँक, झारखंड, रायपूर येथे त्याची नेमूणक करण्यात आली होती. तारीख १ जून २०१९ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत त्यांनी काम केले असून महिन्याचा पगार १५००० रुपये एवढा होता अचानक बँकेने “कॅन्डीड गार्ड सर्विसेस,प्रा लिमिटेड” या कंपनीचे टेंडर बंद केले . तेव्हा कामगारांना कळले कि गेल्या २२ महिन्याची पेन्शनची रक्कम कंपनीने कामगारांचा खात्यात जमा करण्यास टाळाटाळ केली तेव्हा कामगारांनी कंपनीशी संपर्क केला असता नेहमीच उडवाउडवीची उत्तर देण्यात येत होती. काही केला हक्काची पेन्शन मिळत नव्हती, तेव्हा कोणी तरी त्यांना सांगितले कि " कर्मचारी भविष्य निर्वाह निधी " या वेबसाईट जाऊन तुम्ही तक्रार दाखल करू शकता, तेव्हा श्रवण कुमार आणि बिंकेटेश यांनी ऑनलाइन तक्रार दाखल केली पण काही दिवसांनी तक्रारींचे निवारण झाले असे दाखवण्यात आले पण तीन हि कामगारांना पेन्शन काही मिळाली नाही.

श्रवण कुमार सिंग यांना कोणा एका कामगारांकडून टेली काऊन्सिलर मोबाईल नंबर मिळाला. त्यानंतर हेल्पलाईन मध्ये ४ जून २०२२ रोजी त्याची तक्रार दाखल करण्यात आली श्रवण कुमार यांनी त्यांचे अजून दोन सहकारी याचा सोबत तक्रार हेल्पलाईन मध्ये रजिस्टर केली.

हेल्पलाईनचा माध्यमातून कंपनीचे मालक प्रवीण सिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि तुम्ही आम्हाला मेल करा, त्यावर आम्ही उत्तर देऊ तेव्हा हेल्पलाईनने लगेच कंपनीला याबाबत मेल केला .त्याचा दुसऱ्या दिवशी कंपनीचा अकाउंट डिपार्टमेंटमधून विजय याचा फोन आला तेव्हा त्यांनी या तीन कामगारांची पूर्ण माहिती हेल्पलाईन कडून घेतली आणि लवकर तुम्हाला याबाबत सांगू असे सांगितले . मात्र तीन दिवस होऊन हि काही उत्तर येत नाही म्हणून विजय यांचाशी संपर्क साधाला असता त्यांनी फोन उचलणे बंद केले एक आठवडा विजय फोनला काहीच प्रतिसाद देत नाही म्हणून पुन्हा एकदा कंपनीचे मालक प्रवीण यांना याबाबत विचारणा केली असता आम्हाला थोडा वेळा द्या , तुमच्याशी लवकरच संपर्क साधून असे सांगितले. लगेच दुसऱ्या दिवशी विजय यांनी फोन करून सांगितले कि येत्या ६ जुलैपर्यत कामगारांना पेन्शन मिळून जाईल आम्ही तुम्हाला चलन पाठवू असे सांगितले पण ७ जुलैपर्यंत सुद्धा कामगारांना काही पेन्शन मिळाली नाही. पुन्हा एकदा अकाउंट डिपार्टमेंटशी बोलल्यावर त्यांनी कंपनीचे पेन्शन अधिकारी दिलीप तिवारी यांचा नंबर दिला. दिलीप तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मान्य केले कि कामगारांची पेन्शन कंपनीने भरली नाही. येत्या ४-५ दिवसाचा मला वेळ द्या मी तुम्हाला चलन पाठवतो असे त्याचाकडून सांगण्यात आले . त्यानंतर पेन्शन अधिकारी तिवारी यांनी कामगारांशी संपर्क साधून मांडवली करण्याचा प्रयत्न केला पण कामगारांनी नकार दिला आणि सांगितले तुम्ही इंडिया लेबरलाईनशी बोला याबाबत तिवारी यांच्याशी बोले असता त्यांनी सांगितले कि आपण असे काही केले नाही. या उलट आपण येत्या ५ दिवसात पेन्शनची चलन पाठवू असे सांगितले . १३ जुलै रोजी तिवारी यांनी कामगारांचा खात्यात पेन्शन जमा केल्याचे चलन पाठवले आणि आठ दिवसात त्यांचा खात्यात पैसे दिसतील असे सांगितले . पण १० दिवस झाले तरी खात्यात पैसे आले तेव्हा पेन्शन अधिकारी तिवारी यांच्याशी संपर्क साधला पण त्यांनी आजारी असल्याचे सांगितले . पुन्हा एकदा कंपनी चे मालक प्रवीण आणि अकाउंट डिपार्टमेंटचे विजय यांच्याशी संपर्क साधण्यात आला पण नेहिमीप्रमाणे त्यांनी फोन उचलणे बंद केले

आता कंपनीशी बोलण्यातून काहीच साध्य होणार नाही हे चित्र स्प्ष्ट झाले होते, तेव्हा २९ जुलै रोजी “कर्मचारी भविष्य निर्वाह निधी " या वेबसाईट जाऊन ऑनलाईन तीन कामगारांची ओटीपी आणि UAN नंबरचा मदतीने तक्रार दाखल करण्यात आली आणि कामगारांना सांगण्यात आले कि रोज त्यांनी वेबसाईट जाऊन पाहायचे कि काही मेसेज आला आहे का ? तारीख ५ ऑगस्ट रोजी प्रादेशिक पेन्शन आयुक्त जय शंकर प्रसाद यांनी कंपनीला ऑनलाईन नोटीस पाठवली, त्यानंतर ३ दिवसाची मुदत कंपनीला देण्यात आली होती . तारीख १० ऑगस्ट रोजी श्रवण कुमार यांचा पेन्शन खात्यात ७२,०३२ रुपये , बिंकेटेश यांना ७०,६०० रुपये आणि धनंजय यांना ७०५५८ रुपये असे एकूण २,१३, १९० एवढी पेन्शन कामगारांचा पेन्शन खात्यात जमा झाली.

कामगारांना त्यांचे हक्काचे पेन्शन मिळाल्याने त्यांनी इंडिया लेबर लाईनचे आभार मानले आहेत